मृद -जल संधारण विभाग सांगोला यांच्या निष्क्रियते विरोधात राजू बाबर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू.
माणदेश मैदान न्युज नेटवर्क -
सांगोला तालुक्यातील मृद व जल संधारण उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वारंवार मागणी करूनही माहिती न मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजू प्रल्हाद बाबर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जागीच धरणे आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात राजू बाबर यांनी नमूद केले आहे की, सन २०२४-२५ ते २०२६ या कालावधीत सांगोला तालुक्यात विविध कामे टेंडर पद्धतीने मंजूर झाली असून ती सुरू आहेत. संबंधित कामांचे वर्क ऑर्डर, प्लॅन इस्टीमेट,पूर्ण झालेल्या कामांची बिले,तसेच जीओ-टॅगिंगचे फोटो यांची माहिती वारंवार मागूनही संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही.तसेच सन २०२४-२५ व २०२६ दरम्यान ऑनलाईन टेंडर प्रक्रियेद्वारे मंजूर झालेल्या कामांचीही सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजू बाबर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च २०२६ पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी,अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी प्रशासनास दिला आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments