Type Here to Get Search Results !

No title

सांगोला शहरालगत महुद रोडवर अवैधरित्या बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू ; महसूल प्रशासन यंत्रणा कुठे झोपली का ?



माणदेश मैदान न्युज / मुख्य संपादक 

[श्री.बबन चव्हाण]

         सांगोला शहरालगत महुद रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. ट्रॅक्टर, डीपर ,जेसीबीद्वारे रात्री-अपरात्री दिवसरात्र बेकायदेशीररीत्या अविरतपणे मुरूम उपसा सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

        या अवैध बेकायदेशीररित्या मुरूमाच्या उत्खननामुळे पर्यावरणासह शेतजमिनींचे मोठे नुकसान होत आहे. तरीदेखील महसूल व पोलिस प्रशासनाने डोळेझाक केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.यामागे राजकीय दबाव असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत असून, “अखेर हा आशीर्वाद कुणाचा ?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.



Post a Comment

0 Comments