Type Here to Get Search Results !

शासन निर्णयात फेरबदल ; जबाबदारी निश्चित करण्याची मागणी.

शासन निर्णयात फेरबदल ; जबाबदारी निश्चित करण्याची मागणी.


माणदेश मैदान न्युज 

 [मुख्य संपादक / बबन चव्हाण]

           दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये फेरबदल करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात जबाबदार ठरलेल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपसचिव वर्षा देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी पुढे आली आहे.
     सदर निर्णयातील बदलामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाशी निगडीत प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मत व्यक्त होत आहे. शासन पातळीवर झालेल्या या बदलामागील कारणमीमांसा, तसेच निर्णय प्रक्रियेत झालेले कथित दुर्लक्ष यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
      राजकीय व सामाजिक संघटनांनी तात्काळ जबाबदार व्यक्तींवर कारवाई करून विश्वास पुनर्स्थापित करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांत याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर कोणताही निर्णय नाही झाला तर या संदर्भात पुढील काही दिवसांमध्ये इंजी. रामचंद्र घुटुकडे, आर, वाय घुटुकडे सर उपोषणास बसणार बसणार आहे.


Post a Comment

0 Comments