योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरून, प्रकाश आंबेडकर संतापले मुख्यमंत्र्याकडे केली राजीनाम्याची मागणी..!
माणदेश मैदान न्युज (वाहिद आतार)पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापलंय.नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केलाय. मात्र या प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी असंवेदनशील विधान केलं आहे.त्यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रातील राजकरणाला सध्या लकवा मारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्री कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय ? असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली दिरंगाई पुणे पोलिसांच्या अपयश आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
# दीड हजार पानांच्या आरोप पत्रावर टीका.
प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात, बीड पोलिसांनी दाखल केलेल्या दीड हजार पानांच्या आरोप पत्रावर जोरदार टीका केली आहे. बीड पोलिसांनी दाखल केलेल्या दीड हजार पानांचे आरोपपत्र खूप मोठे आहे. हे आरोपपत्र आहे की पीएचडीचा प्रबंध ? असा मोठा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.दीड हजार पानांच्या आरोप पत्रातून गोंधळ निर्माण होऊ शकतो.तसेच याचा फायदा संबंधित आरोपींना होऊ शकतो, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणाऱ्या पोलिसांची कीव करावीशी वाटतेय, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

!doctype>
Post a Comment
0 Comments