महुद ता.सांगोला येथे अवैध धंद्यांना ऊत ; पोलिस प्रशासनाचे हाथाची घडी तोंडावर बोट...!
माणदेश मैदान न्यूज (सांगोला प्रतिनिधी) :-सांगोला तालुक्यातील महुद, चिकमहुद, कटफळ, अचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर, इटकी, महिम, खिलारवाडी, गायगव्हाण परिसरामध्ये अवैधरित्या खुलेआमपणे गुटखा, जुगार,मटका, दारू विक्री सुरू असून, पोलीस प्रशासन मात्र याकडे सतत दुर्लक्ष करताना दिसत आहे.या व्यवसायिकांचे व पोलिसांचे काही लागेबांधे तर नाहीत ना? अशी चर्चा नागरिकांमधून वारंवार होत आहे.महुद परिसरात लपून छपून चालणारा मटका आता खुलेआम धडदेखत सुरू आहे.सध्या साथीच्या रोगाप्रमाणे फोफावत असलेला खासगी सावकारकीचा व्यवसाय,यासह गल्लीबोळात चालणारा मटका व अवैध दारू विक्री ही गंभीर समस्या बनत चालली आहे.श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत. राजरोसपणे सुरू असणारा ओपन मटका क्लोज कधी होणार,असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महुद परिसरामध्ये अवैध धंदे दिवसाढवळ्या तेजीत सुरू असताना पोलीस अधिकारी झोपेचे सोंग घेवून हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था आहे. महुद शहरामध्ये जबरी चोऱ्या व घरफोड्या हे गुन्हे नित्याचे झाले आहेत. कित्येक जण जुगाराच्या नादापाई अक्षरश देशोधडीला लागले आहेत. मटक्याच्या आकड्यावर पैसे लावणारे कित्येक जण कर्जबाजारी होऊन गाव सोडून गेले आहेत. मात्र यातून मिळणाऱ्या पैशातून एजंट आणि मटका बुक्की मालक मात्र मालामाल झाले आहेत.आकड्यावर पैसे लावून आयुष्याचा जुगार खेळणाऱ्या अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.ह्या सांगोला तालुक्याला खमक्या पोलिस अधिकाऱ्याची सद्या गरज आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments