जि.प.प्राथमिक शाळा (नवी) लोटेवाडी शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्ष पदी ॲड.सतिश पडळकर व उपाध्यक्ष पदी धनाजी मोटे यांची एकमताने निवड.
संपादक बबन चव्हाण(BA.DMCJ) 7058917143
लोटेवाडी प्रतिनिधीशनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी जि.प.प्राथमिक शाळा लोटेवाडी नवी ता.सांगोला जि. सोलापूर येथे सकाळी १०.३० वा. पालक सभा आयोजित करण्यात आली होती पालक सभेतून सण २०२५ -२०२६ , २०२६-२०२७ सालासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे नुतन अध्यक्ष म्हणून ॲड.श्री. सतिश पडळकर तसेच उपाध्यक्षपदी श्री.धनाजी मोटे यांची निवड करण्यात आली.सदर पालक सभेतून शाळा व्यवस्थापन समिती संपन्न करण्यात आली.
नूतन अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.अध्यक्ष, उपाध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अध्यक्षांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून शाळा सर्वोत्तम बनवणार व शाळेच्या भौतिक गरजा व इतर सर्व सुखसोयी गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष देऊन शाळेची गुणवत्ता वाढवण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सदर पालकसभेसाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सरगर सर यांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर सभा संपन्न झाली.

!doctype>
Post a Comment
0 Comments