Type Here to Get Search Results !

*श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉ.नाझरे येथे श्री. मुलाणी एस. एम. व श्री. बाबर एम. एस. यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न*

 *श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉ.नाझरे येथे श्री. मुलाणी एस. एम. व श्री. बाबर एम. एस. यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न*





  नाझरे (प्रतिनिधी)

        नाझरे ता- सांगोला येथील श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉ. नाझरे येथे 10 ऑगस्ट 2024 रोजी स्व. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशालेतील पर्यवेक्षक श्री मुलाणी एस. एम. व ज्येष्ठ शिक्षक श्री. बाबर एम. एस. यांचा सेवानिवृत्ती निमित्त संस्था व प्रशालेचे वतीने सत्कार घेण्यात आला. याप्रसंगी मार्च 2024 मध्ये एस. एस. सी. परीक्षेत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणारी प्रशालेची विद्यार्थिनी कु.उमा जांभळे  व तिचे पालकांचा तसेच 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती पात्र शुभम दोलतडे व मयुरेश बाबर या विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव श्री. मुकुंद पाटील सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पं स माजी उपसभापती सुनीलभाऊ चौगुले, सरपंच सौ. मंदाकिनी सरगर, नूतन उपसरपंच सौ.सुवर्णा पाटील या उपस्थित होत्या, सुरुवातीस स्व. गणपतरावजी देशमुख व संस्थेचे संस्थापक कै. वसंतरावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी स्व. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी कु.सानिका पाटील, योगिता गोसावी, श्रुती पाटील यांनी तसेच मा. उपसभापती सुनीलभाऊ चौगुले, मा. प्राचार्य श्री. प्रकाशराव परिचारक, प्रा. विजय गोडसे , नवनाथ बंडगर सर, प्राचार्या यास्मिन मुल्ला मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली तसेच सत्कारमूर्ती श्री. शहाजहान मुलाणी सर, श्री. मच्छिंद्र बाबर सर यांनीही सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बंडोपंत येडगे सर, प्रा.विजय गोडसे सर, श्री.शिवभूषण ढोबळे सर यांनी केले. याप्रसंगी राजुरी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बापूसाहेब काटे सर, नाझरा शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोळी गुरुजी, नयन पाटील मॅडम,मा. संजय सरगर,मा.उपसरपंच मधुकर आलदर,मा. शशिकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, पत्रकार अतुल फसाले, दत्तात्रय वाघमोडे, कस्तुरा जांभळे मॅडम, रामचंद्र जांभळे, संगाप्पा सरगर, समीर मुलाणी, तसेच मुलाणी सर व बाबर सर यांचे कुटुंबीय व माजी विद्यार्थी तसेच नाझरे व राजुरी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.कस्तुरा पाटील यांनी केले व शेवटी विद्यार्थी व शिक्षक यांना स्नेहभोजन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments