सांगोला तालुक्यात अवैध सर्व धंद्यांना ऊत,वाळू चोरीला लगाम लागेना स्थानिक तालुका प्रशासन कोमात...!सामाजिक कार्यकर्ते: हरीभाऊ पाटील
सांगोला माणदेश मैदान
सांगोला तालुक्यातील अवैद्य वाळू उपसा / अवैध वाहतूक गौण खनिजाची राजरोसपणे होणारी चोरी, अवैद्य दारु, अवैद्य तंबाखू, गुटखा राजरोसपणे दिवसा ढवळया होणा-या खुन, मारामा-या, मटका, जुगार, क्लब, लॉजवरील अवैद्य वेशा व्यवसाय, अवैद्य प्रवासी वाहतुक, अवैद्य जड वाहतुक, अवैद्य जनावरे वाहतुक, गैरमार्गाने हप्ते वसूलीने चालणारे सर्व अवैद्य व्यवसाय बंद होण्यासाठी सदर प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक व तहसिलदार सांगोला यांची कसुन चौकशी व्हावी. व चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात यावी.सांगोला तालुक्यात गेल्या १ ते ४ वर्षापासून सांगोला तालुक्यात अवैद्य वाळू उपसा वाहतूक चोरुन / चोरी करुन इतरत्र विक्री केली जात आहे. हा व्यवसाय टोळी टोळीने होत असल्याने तालुक्यात गुन्हेगाराच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि हप्ता वसूली असल्याने त्याकडे उघडपणे डोळेझाक केली जात आहे. व गुंडाना पाठीशी घातले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुंड राजरोसपणे तलवारी, बदुक घेवून खून करीत असल्याचे रजिस्टर प्रमाणे नोंद झालेले खुन, मारामा-या, चो-या इ. प्रकारची सखोल चौकशी व्हावी. महाराष्ट्रात सर्वत्र गुटखा बंदी असताना सीसुक्यातील सर्वत्र पानटपरीमध्ये सर्वास गुटखा विक्री केली जात आहे. यासाठी हप्ता वसुली होवून हा व्यवसाय होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजातील लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढून कॅन्सर सारख्या जिवघेण्या रोगाचे प्रस्थ वाढत आहे. अगदी शाळा कॉलेज शेजारील पान टप-या गध्ये सुध्दा विक्री केली जात आहे. व्यसनाधिानाचे प्रमाणे वाढले आहे. धाडसी दरोडे, मोबाईल चो-या राजरोसपणे होत आहेत. फार मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी दारुचे व्यवसाय वाढलेले आहेत हे प्रकार हप्तेखोरीमुळेच वाढले आहेत. गुन्हे रजिस्टर प्रमाणे गुन्हयाची संख्या पाहता कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. व हे वास्तव आहे आगदी ही गुन्हेगारी मंडळी पोलीस स्टेशनमध्ये राजरोसपणे फिरताना दिसून येत आहे. या बाबत सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात यावेत.
सांगोला तालुक्यात अवैद्य प्रवासी वाहतुक केली जात आहे. अवैद्य जड वाहतुक केली जात आहे. अगदी लॉजवर सुध्दा अवैद्य वेशा व्यवसाय चालु आहे यामध्ये स्थानिक राजकारण असल्याचे च दिसून येत आहे.
तसेच अवैद्य मटका, दारु, जुगार इ. व्यवसाय राजरोसपणे चालविले जात आहेत. अगदी जनावरांची सुध्दा अवैद्य वाहतुक केली जात आहे. या वसुलीतून महिना अंदाजे १० ते १५ कोटी रुपये मासिक जमा होतात. असे समजले जाते. याबाबत सखोल चौकशी व्हावी,प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य गोरगरीब जनतेचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात भयावह वातावरण होत आहे. कधी कोण कुणाचा कशासाठी खून करेल हे सांगता येत नाही, हा वरवरचा प्रश्न राहिलेला नाही या बाबतचे सुनिल कांबळे महुद बु।। खुन प्रकरण हे ताजे उदाहरण घेता येईल.शांतता व सुरक्षिततेचा सांगोला तालुका आता गुंडाचा तालुका म्हणुन ओळख होत चालली आहे. या बाबत गांर्भीर्याने नोंद घ्यावी तशा पध्दतीच्या सुचना संबधिताना देण्यात याव्यात कायदा व सुव्यवस्था राखणा-या यंत्रणेवर कडक कारवाई ची गरज आहे. या बाबत चौकशी समिती नेमण्यात यावी व सांगोला तालुक्यातील अवैद्य व्यवसाय त्वरीत बंद व्हावेत. तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे संबधीत मा. पोलीस निरिक्षक व तालुका सांगोला येथील संबधीत मा. तहसिलदार यांची कसुन चौकशी व्हावी. व चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमण्यात यावा. मी हरिभाऊ पाटील दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन शासकीय कार्यालयीन वेळेत करणार आहे. सदर बेमुदत धरणे आंदोलनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर बसलो आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments