*गावोगावी फिरते वाचनालय सुरू करा : ना. चंद्रकांतदादा पाटील;* *रहिमतपूरच्या हिंद नगरवाचनालय व ग्रंथालयास प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या रहिमतपूर नगरीतील हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय अभ्यासिकेस राज्य सरकारचा शहरी विभागातील प्रथम क्रमांकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला होता. त्याचे वितरण मंगळवारी सायंकाळी मुंबईत शानदार सोहळ्यात झाले. त्याप्रसंगी राज्यभरातील ग्रंथालय चालक, पदाधिकारी व ग्रंथपालांशी संवाद साधताना मंत्री पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले, राज्य आणि सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, ग्रंथालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी लुबाळ, ढेरे आणि खाते प्रमुख उपस्थित होते.
हिंद नगरवाचनालय ग्रंथालयाच्या वतीने रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने, आनंदा कोरे, हणमंतराव भोसले, रमेश माने, बेदिल माने, विद्याधर बाजारे, दीपक नाईक, अविनाश कदम, विकास पवार, विश्वास नेरकर सर, सुहास कोरे, मितेश कोरे, उर्मिला जाधव, ग्रंथपाल संजय जंगम, सहाय्यक ग्रंथपाल उमा सावंत, धैर्यशील सुपले, नानासाहेब राऊत व इसाक भाई मांडवे यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदनगर वाचनालयाचे विशेष अभिनंदन केले. कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ टिकवून ठेवल्याबद्दल त्यांनी व्यक्तिशः पुरस्कार देत असताना मान्यवरांच्या पाठीवर शाबासकीची थाप पाठीवर टाकली.
दरम्यान रहिमतपूर शहरात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करून हिंद नगरवाचनालय ग्रंथालय अभ्यासिकेच्या विश्वस्त मंडळ आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

!doctype>
Post a Comment
0 Comments