*बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार कार्यालयावर मोर्चा*
बांधकाम कामगारांच्या नोंदणी-नूतनीकरण आणि लाभाची प्रलंबित प्रकरणे त्वरीत पूर्ण करावीत, कोरोचीत दवाखाना सुरु झाला आहे. त्याबाबत दवाखाना व्यवस्थापनाशी कामगार संघटनांची बैठक लावावी, कामगारांना त्वरीत भांडी संच मिळावेत, घरकुल योजनेचे ४.५ लाख रुपये अनुदान द्यावं, ६० वर्षांवरील कामगारांना महिन्याला १० हजार रुपये पेन्शन लागु करावी, एजंटांची बोगसगीरी रोखावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने मुख्यमार्गावरून मोर्चा काढण्यात आला. कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.
येथील सहाय्यक कामगार नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठीलालबावटा बांधकाम कामगार यांची मागणी पूर्ण न झाल्यास २ सप्टेंबरपासून कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात भरमा कांबळे, सदा मलाबादे, नुरमहंमद बेळकुडे, नागेश पाटील, सत्तार मुजावर, दिलीप कोळी, युसूफ शेख, बापू कांबळे, संदिप सुतार, सिकंदर कौजलगे, विजय कांबळे, रामदास सुतार यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
.jpg)
!doctype>
Post a Comment
0 Comments